मालेगाव : शहरातील सध्या गाजत असलेल्या मालेगाव मर्चंट्स को. आॅपरेटिव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी १९ जागांसाठी मंगळवारी ९२ अर्ज दाखल झाले. सोमवारपर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारअखेर एकूण ९६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.मामको बॅँक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असून, आतापर्यंत पहिल्या दिवशी रविवारी ५५, सोमवारी १०१ आणि मंगळवारी ३५ अशा एकूण सुमारे १९१ जणांनी उमेदवारी अर्ज विकत नेले. बुधवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. गुरुवारी (दि. ८) दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत माघारीची मुदत असून, रविवारी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे बुधवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची गर्दी होणार असून, कोण-कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात, याकडे शहराचे लक्ष लागून आहे.मंगळवारी अखेर दाखल अर्जात सर्वसाधारण गटात ७८, महिला राखीव गट, इतर मागास वर्ग-६, अनुसूचित जाती जमाती गट-२, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष प्रवर्ग-गट ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आधीच सत्ताधारी गटाला सुरूंग लागला असून, तीन पॅनलमध्ये लढत होणार असली तरी खरी लढत दोनच पॅनलमध्ये रंगणार आहे. अर्ज छाननी नंतर पॅनलचे चित्र स्पष्ट होणार आहे.(प्रतिनिधी)
मामको बॅँक निवडणूक
By admin | Updated: October 6, 2015 22:33 IST