शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

अभाविप विरूद्ध माळी महासंघ आक्रमक

By admin | Updated: December 5, 2015 23:34 IST

अभाविप विरूद्ध माळी महासंघ आक्रमक

सिडको : पुणे येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घातलेल्या गोंधळाचा माळी समाज महासंघाने निषेध केला असून, धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल करावे अन्यथा संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तिडकेनगर येथील दुर्वांकूर मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाजन यांनी सांगितले की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कार्यक्रमात धिंगाणा घातला असून, ही बाब निंदनीय आहे. हिम्मत असेल तर असा धिंगाणा यापुढे करून दाखवा व त्याचे परिणाम बघा, असे आव्हानही यावेळी महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिले. या घटनेस आठ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही राज्य सरकारने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने त्यांचाही यावेळी निषेध केला. तसेच या कार्यकर्त्यांवर सरकारने गुन्हे दाखल करावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही महाजन यांनी दिला. याप्रसंगी माळी समाज महासंघाचे कार्याध्यक्ष बाजीराव तिडके, राजेंद्र गाडेकर, सदाशिव नाईक, विठ्ठल पवार, किशोर क्षीरसागर, रेखा महाजन आदि उपस्थित होते. (वार्ताहर)