मालेगाव कॅम्प : येथील एकात्मता चौकात गेल्या अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू असून, पिण्याचे पाणी सरळ गटारीत जाऊन मिळत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. संबंधितांनी त्वरित जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.मालेगाव कॅम्प रस्त्यावर मौक्तिक कॉर्नरजवळील मोेठ्या गटारीलगत मनपाची जलवाहिनी असून, मुख्य रायझिंग जलवाहिनी असल्याने पाण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे येथे पाण्याची गळती होते. गळती होत असताना येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रायझिंग जलवाहिनीमधून पाण्याच्या प्रवाहासोबत हवेचा दाब काढण्यासाठी येथे लिकेज ठेवले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जलवाहिनी इतर ठिकाणी नादुरुस्त होऊ नये. सर्वत्र पाणीटंचाई असताना शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असताना मनपाचे संबंत्धित अधिकारी लक्ष देत नाहीत. (वार्ताहर)
मालेगावी पाण्याची गळती
By admin | Updated: September 8, 2015 22:50 IST