शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी दुसऱ्या दिवशीही बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:37 IST

मालेगाव : काल कोरोना विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर आज सोमवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली तर पुन्हा ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन होण्याच्या भीतीने शहरवासियांनी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली.

कॅम्पातील सोमवार बाजारात पेट्रोलपंपावर वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी शहरवासियांनी रांग लावली होती. सोमवार बाजारसह बाजार समितीतील दुकाने आजही बंद होती. मोसमपुल ते कॅम्प रस्त्यावर तुरळक वर्दळ सुरू होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मोसमपुल भागात पोलीसांनी संरक्षक जाळ्या लावून रस्ते अडविल्याने दुचाकीस्वारांना माघारी जावे लागले. जुना बसस्थानक परिसरात बाहेरगावाहून कोणतीही वाहने न आल्याने शुकशुकाट होता. पूर्व भाागतील भंगार बाजार, किदवाई रोड, पेरी चौक या भागातील दुकाने मात्र नियमितपणे सुरू असल्याचे आढळून आले. महापालिकेतर्फे संगमेश्वरसह ठिकठिकाणी औषधांची फवारणी करण्यात आली.शहरातील नागरिक आज तोंडाला मास्क आणि रुमाल लावूनच बाहेर पडताना दिसले. त्यामुळे उशिरा का होईना कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिक खबरदारीचे उपाय योजत असल्याचे दिसून आले. शहरवासियाकडून औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर मास्क खरेदीसाठी होणारी गर्दी पाहून काही मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांकडून त्याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा अशा चढ्या दराने मास्क आणि हॅण्डग्लोजची विक्री होत असल्याचे दिसून आले. दरम्यान प्रवाशांंची वर्दळ असणा-या शहरात प्रथमच अघोषित संचारबंदीचे वातावरण असल्याने आणि बसेसही बंद असल्याने तालुक्यासह बाहेरगावहून कुणी प्रवासी शहरात येऊ शकला नाही.परिणामी नागरिकांना दुचाकीचा वापर करावा लागला. पूर्व भागातील काही ठिाकणी मात्र रिक्षा सुरू असल्याचे दिसून आले. काल अपर पोलिस अधीक्षकांनी मौलानांची बैठक घेऊन मशिदींमधून नागरिकांची जनजागृती करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याचा काहीसा परिणाम आज दिसून आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या