शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ४७ मजूर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:32 IST

मालेगाव मध्य : शहरालगतच्या मनमाड चौफुली येथे रात्री दीडच्या सुमारास ४७ परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारा एका बारा चाकी वाहनास किल्ला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मालेगाव मध्य : शहरालगतच्या मनमाड चौफुली येथे रात्री दीडच्या सुमारास ४७ परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारा एका बारा चाकी वाहनास किल्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालक फरार झाला आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देश लॉकडाउन करीत संचारबंदी लागू आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर शासनाने निर्बंध घातले आहे. असे असतानाही चालक जगदीश पोखरजी रेगर चित्तोडगढ याने बाराचाकी वाहनातून (क्र. आरजे ०९ जीव्ही ६७२५) ४७ मजुरांना घेऊन जात होता. मनमाड चौफुलीवर किल्ला पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना या वाहनावर संशय बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यात मजूर बसल्याचे आढळून आले. चालक फरार झाला असून मजुरांमध्ये ४१ पुरुष, पाच महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. सर्व मजूर पुणे, सोलापूर परिसरात कामानिमित्ताने गेले होते. लॉकडाउनमुळे हाताला काम नाही, जवळ असलेले पैसेही संपल्याने पोट भरण्याच्या विवंचनेत असतानाच सरकारने लॉकडाउनमध्ये मुदतवाढ केली. यामुळे मजुरांचा संयम सुटल्याने हजारो किलोमीटर अंतरावरील घरं गाठण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील मजुरांचा समावेश असून, पायी येत असताना ते शिक्रापूर, शिर्डी अशा ठिकाणांहून वाहनात बसले होते.पोलिसांनी सर्व मजुरांना नियंत्रण कक्ष आवारात आणून सकाळी त्यांची नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यांची देवळा येथील निवारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक जप्त केला आहे तर फरार वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार बबन सूर्यवंशी हे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक