शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

रंगांत रंगण्यासाठी मालेगावकर सज्ज

By admin | Updated: March 10, 2015 23:00 IST

रंगांत रंगण्यासाठी मालेगावकर सज्ज

संगमेश्वर : मालेगाव शहर व तालुका रंगपंचमी सणाच्या स्वागतासाठी व या सणाच्या रंगांत न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. अवकाळी पावसाचे संकट जरी ओढवले असले, तरी त्यावर मात करत रंगपंचमीच्या तयारीत शहर - तालुक्यातील जनता विशेषत: तरुणवर्ग व बच्चेकंपनी मग्न झाली आहे. रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. येथील गूळबाजार, संगमेश्वर, मोसमपूल, कॅम्प, सोमवार बाजार व सटाणा नाका तसेच मोतीबाग नाका भागात रंगपंचमीनिमित्त अनेक दुकाने सजली आहेत. याठिकाणी रंगपंचमीसाठी लागणाऱ्या विविध आकाराच्या, प्रकाराच्या आणि रंगसंगतीतील पिचकाऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. कार्टून व बंदूक स्वरूपातील अशा पिचकाऱ्यांनी लहान मुलांना विशेष आकर्षित केले आहे. किमान २० ते ५०० रुपयांपर्यंत या पिचकाऱ्यांची किंमत आहे. तसेच लाल, पिवळा, हिरवा, जांभळा, सोनेरी आदि विविध प्रकारचे रंगही बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदाच्या रंगपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात रासायनिक रंगांसोबत हर्बल व पर्यावरणपूरक रंगदेखील बघावयास मिळत आहेत. पर्यावरणप्रेमी मालेगावकरांकडून या रंगांच्या खरेदीस विशेष महत्त्व दिले जात आहे. शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये देखील रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. यंदा शहर - तालुक्यात पाण्याची अजून टंचाई नाही. त्यामुळे रंगपंचमीच्या या उत्सवात पाणीटंचाई जाणवणार नाही. तसेच गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत मनपा प्रशासनातर्फे रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी थोडा वेळ अंघोळीसाठी पाणी सोडले जात असे. ती परंपरा खंडित झालेली आहे. यंदा मनपाने ती परंपरा पुन्हा सुरूकरून संबंधित विभागात सायंकाळी अतिरिक्त पाणीपुरवठा करून रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करावा, अशी मागणी सर्वसामान्य मालेगावकरांकडून केली जात आहे.