मालेगाव : धावत्या रेल्वेत ओळख झालेल्या हैदराबाद येथील अकबरउल्ला खान याने मालेगावी विवाहितेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन सासरच्या मालमत्तेवर हक्क मिळवून देण्याचा बहाणा करून ८१ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असा दोन लाखांना गंडा घालून फरार झाला. छावणी पोलिसांत तौकीर मोहंमद हुसेन (३९) रा. शालिमार फुटवेअर दुकानाच्या बाजूला इस्लामपुरा भागातील महिलेने सोमवारी रात्री छावणी पोलिसांत फिर्याद दिली. सदरची घटना २२ डिसेंबर रोजी हॉटेल मराठा दरबार आणि २९ डिसेंबर रोजी कॅम्प रोडवरील पिझ्झा हॉटेल येथे घडली. तौकीर मोहंमदकडून २२ डिसेंबर रोजी दुपारी हॉटेल मराठा दरबारमध्ये ८१ हजार ५०० रूपयांची रोकड घेतली तर २९ डिसेंबर रोजी ३ वाजता हॉटेल पिझ्झा येथे बोलावून दागदागिने व अंगठी असा एक लाख १० हजारांचा ऐवज वकिलांकडे ठेवण्याचा बहाणा करुन तसेच वकिलाची फी म्हणून पुन्हा १० हजार रूपये असा दोन लाखांचा ऐवज हस्तगत केला. वेगवेगळ्या १०० रूपयांच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही व अंगठे घेवून फिर्यादीची फसवणूक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत.
मालेगावच्या महिलेला दोन लाखांना गंडा
By admin | Updated: January 13, 2016 00:16 IST