नाशिक येथील कलावंत जयश्री राजेंद्र जाधव यांनी हा एकपात्री प्रयोग सादर केला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवनपट नाट्य अभिनयातून सादर केला. महात्मा फुले मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, मालेगाव २०२०-२१ यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशपाल बागूल यांनी प्रास्तविक केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, सम्राट मंडळ, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी समाज सुधाकरकांच्या प्रतिमांचे पूजन महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष योगेश बागूल, कार्याध्यक्ष नम्रता जगताप, महासचिव रोहित तेली, मंगेश सोनवणे, चेतन आहेर, वैभव सोनवणे, उपाध्यक्ष इमरान राशीद, खुशाल बिरारी, स्वाती वाणी, नरेंद्र सोनवणे, नचिकेत कोळपकर, अशोक कापडे, प्रवीण वाणी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होेते.
मालेगावी ‘व्हय मी सावित्रीबाई’ नाट्य प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST