प्रभाग २ मध्ये आणखी एक प्रकार तसाच घडला. त्यात तेजल पवार व शोभाबाई पवार यांना प्रत्येकी पुन्हा २७३ मते पडली. त्यामुळे पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शोभाबाई पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वळवाडे येथे प्रभाग क्रमांक ३ मध्ये सोनाली पवार आणि सुरेखा शेवाळे यांना प्रत्येकी १६७ अशी समसमान मते मिळाली. साक्षी विलास जाधव या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सोनाली पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वनपट येथील प्रभाग २ मध्ये मंगलबाई शिंदे आणि सुभाबाई सोनवणे यांना प्रत्येकी १८३ मते मिळाली. त्यात सुभाबाई सोनवणे विजयी झाल्या.
मालेगाव तालुक्यात समान मते मिळाल्याने तिघांचे निकाल चिठ्ठी पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST