शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मालेगाव तालुक्यात समान मते मिळाल्याने तिघांचे निकाल चिठ्ठी पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 9:07 PM

मालेगाव : तालुक्यातील ढवळेश्वर, वळवाडे व वनपट या ग्रामपंचायतीत उमेदवारांना सारखीच मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने निकाल देण्यात आला.

ठळक मुद्दे गुलाब गुंजाळ यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित

मालेगाव : तालुक्यातील ढवळेश्वर, वळवाडे व वनपट या ग्रामपंचायतीत उमेदवारांना सारखीच मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने निकाल देण्यात आला. यात ढवळेश्वरला वॉर्ड क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमातीच्या जागेसाठी रिंगणात असलेल्या ज्ञानेश्वर सीताराम गायकवाड व गुलाब रंगनाथ गुंजाळ यांना २७३ समसमान मते पडली. त्यामुळे सुमीत केदारे या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात गुलाब गुंजाळ यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.प्रभाग २ मध्ये आणखी एक प्रकार तसाच घडला. त्यात तेजल पवार व शोभाबाई पवार यांना प्रत्येकी पुन्हा २७३ मते पडली. त्यामुळे पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली. त्यात शोभाबाई पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वळवाडे येथे प्रभाग क्रमांक ३ मध्ये सोनाली पवार आणि सुरेखा शेवाळे यांना प्रत्येकी १६७ अशी समसमान मते मिळाली.

साक्षी विलास जाधव या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सोनाली पवार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. वनपट येथील प्रभाग २ मध्ये मंगलबाई शिंदे आणि सुभाबाई सोनवणे यांना प्रत्येकी १८३ मते मिळाली. त्यात सुभाबाई सोनवणे विजयी झाल्या.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत