शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव तहसीलदारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:12 IST

गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुकीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करणारे येथील तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले लिपिक गोकुळ पाटील हे शरण आले. उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मालेगाव : गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुकीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करणारे येथील तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले लिपिक गोकुळ पाटील हे शरण आले. उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. तालुक्यातील वºहाणे येथील मनोज पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पवार यांचा वीटभट्टी व गौण खनिज विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी येथील महसूल विभागाकडे गौण खनिज वाहतुकीसाठी परवानगी मागितली होती. तसेच ११ जुलै रोजी येथील महसूल विभागाच्या पथकाने त्यांचे डंपर पकडले आणि २ लाख ४ हजार रुपयांचा दंड केला. हा दंड पवार यांनी भरला मात्र त्यांना केवळ १३ हजार रुपयांची दंड भरल्याची पावती देण्यात आली होती. यानंतर डंपर चालवायचे असेल तर ५० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगण्यात आले. तडजोडीअंती ४० हजार रुपये हप्ता ठरला. याबाबत पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने ११ जुलै रोजी पडताळणी केली . त्यानंतर चार ते पाच वेळेस सापळा रचला, मात्र तहसिलदार कोळी व लिपीक पाटील यांनी पैसे स्वीकारले नाहीत. लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरुन शुक्रवारी तहसीलदार कोळी यांना पथकाने कार्यालयातून ताब्यात घेतले. तसेच कार्यालयाची तपासणी केली. येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सुरू असताना लिपीक पाटील हे पथकाला शरण आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक पवन देसले, हवालदार कैलास शिरसाठ, संतोष हिरे, जितेंद्र परदेशी, किरण साळी, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, कैलास जोरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार आदिंनी ही कारवाई केली.मालेगाव महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार, प्रांताधिकारी संदीप पाटील, प्रांत व तहसीलचे प्रत्येकी दोन लिपिक, एक महिला तलाठी हे गेल्या काही वर्षांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले होते. आता तहसीलदार सुरेश कोळी व लिपिक गोकुळ पाटील-सुद्धा अडकले. त्यामुळे तहसील कार्यालयातील भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.