मालेगाव मध्य : ईद्दू मुकादम चौकात रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून पिस्तूलने हवेत गोळीबार करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.नगरसेवक मन्सुर अहमद यांचे बंधू कमर हमीद शब्बीर अहमद हे दुकानासमोर उभे असतांना मुजाहिद नामक रिक्षाचालक तेथून जात असताना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. परंतु चिखल असल्याने दुचाकी बाजूला घेणे शक्य नसल्याने रिक्षा बाजूने काढून घेण्यास सांगितले असता याचा राग आल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर भांडण मिटवून घेण्याचे ठरल्याने मन्सूर अहमद व त्यांचे भाऊ चौकात आले असताना शेरा नामक तरुणाने येथे येत हातात पिस्तूल काढून धमकावले व एक गोळी हवेत झाडली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मालेगावी संशयिताचा हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:32 IST