शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले मालेगाव : पोलीस प्रशासनाची क्रॅक डाउन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:51 IST

मालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखलझोपडपट्टी दादांचे धाबे दणाणले

मालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, साडेतीन लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असतील अशा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाºयांना नोटिसा बजावून लेखी स्वरूपात खुलासा मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची छुप्या पद्धतीने माहिती संकलित करण्यात आली असून, पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथकाद्वारे छापे टाकले जात आहेत. या मोहिमेंतर्गत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. जिल्हाभरातून ४७ फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध मद्य विक्री, बेकायदा मद्य वाहतूक, हातभट्टी, गावठी दारू तयार करणे, अंक आकडे, पत्त्यांवर जुगार खेळणे आदी धंद्यांवर कारवाया सुरू केल्या आहेत.दारूबंदी कायद्यान्वये ५७, तर जुगाराचे १२ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. हातभट्टी तसेच अवैध मद्याचा सुमारे तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल, तर जुगाराचे एक लाख आठ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत अवैध धंदे सुरू असतील अशा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी ९१६८५५११०० या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच फेसबुक पेज व ट्विटर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यासह ०२५३-२३०९७१५ या क्रमांकावरही संपर्क साधून नागरिकांना माहिती देता येणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अवैध धंदेवाल्यांचे व सराईत गुन्हेगारांचे, झोपडपट्टी दादांचे धाबे दणाणले आहे.