शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दुसऱ्या लाटेतही मालेगाव पॅटर्न चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:57 IST

नाशिक : पहिल्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव दुसऱ्या लाटेत नियंत्रणात आहे. नागरिकांची वाढलेली प्रतिकारशक्ती, मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टर व अत्यल्प खर्चात होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे तसेच कोरोनाच्या भीतीला दूर सारीत मालेगावातील पूर्व भागातील नागरिकांनी कोरोनावर धाडसाने मात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाण घसरल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस व महापालिकेच्या सततच्या कारवाया व नागरिकांनी दाखविलेला संयम व सहकार्यामुळे मालेगावी कोरोना नियंत्रणात आला असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकोरोनावर नियंत्रण : रुग्णसंख्येसह मृत्यूचेही प्रमाण घसरले

अतुल शेवाळेनाशिक : पहिल्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव दुसऱ्या लाटेत नियंत्रणात आहे. नागरिकांची वाढलेली प्रतिकारशक्ती, मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टर व अत्यल्प खर्चात होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे तसेच कोरोनाच्या भीतीला दूर सारीत मालेगावातील पूर्व भागातील नागरिकांनी कोरोनावर धाडसाने मात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांसह मृत्यूचे प्रमाण घसरल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस व महापालिकेच्या सततच्या कारवाया व नागरिकांनी दाखविलेला संयम व सहकार्यामुळे मालेगावी कोरोना नियंत्रणात आला असल्याचे चित्र आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून मालेगाव शहरातील आठ व ग्रामीणचे दोन अशा दहा पोलीस ठाण्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या गेल्या १५ दिवसांपासून ५० पेक्षा कमी आढळून आली आहे. पूर्व भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवताच मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टरांकडून तातडीने उपचार केले जात आहेत.

पूर्व भागातील डॉक्टरही कोरोनाबाधित रुग्णांशी बिनधास्तपणे संवाद साधून वेळीच औषधोपचार करत आहेत. मालेगावच्या नाइट लाइफमुळे रुग्णालये २४ तास खुली असतात. शहरातील नागरिकांना तातडीने उपचार उपलब्ध होत असल्यामुळे गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. गेल्यावर्षी मालेगाव पॅटर्न चर्चेला आला होता. यंदा कोरोनाची लाट भयावह असतानादेखील नागरिकांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यात मालेगावची रुग्णसंख्या कमी आहे.

येथील बडा कब्रस्थानात १ मे ते १६ मे दरम्यान १३८ दफनविधीची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी मे महिन्यात ३४१ दफनविधी झाले होते. १३८ पैकी केवळ ८ ते १० मृत्यू कोरोनाबाधितांचे आहे. अन्य मृत्यू नैसर्गिक व इतर कारणांमुळे झाल्याचे नोंदींवरून दिसून येत आहे. आयेशानगर कब्रस्तानात १ ते १५ मे दरम्यान ३८ दफनविधी झाले आहेत. यात फक्त एक कोरोनाबाधित व अन्य आजाराने व नैसर्गिक कारणांमुळे ८ लहान मुले व २९ ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते.नियंत्रणाची ही आहेत कारणे...रमजान पर्वानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र पौष्टिक व सकस आहाराचे सेवन, यंत्रमाग कामगारांची मेहनत, पुरेसा आराम या गोष्टी कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावी पोषक ठरत आहेत. शहरातील डॉक्टरांकडूनही कोरोनाची भीती नाहीशी करून रुग्णांच्या जवळ जात मानसिक आधार देऊन रुग्णांचे समुपदेशन केले जात आहे. परिणामी भीतीचा आजार असणारा कोरोना मालेगावात नियंत्रणात आहे. १ मे रोजी एकूण ५१४ रुग्ण आढळून आले होते, तर १७ मे रोजी ११९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या