शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

मालेगाव पोटनिवडणूक : मतदारांमध्ये निरूत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 14:47 IST

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ ड च्या रिक्त जागेसाठी सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली.

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ ड च्या रिक्त जागेसाठी सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत १७.७४ टक्के मतदान झाले. महापालिकेच्या प्रभाग १२ ड च्या रिक्त जागेसाठी आज मतदान प्रक्रिया घेतली जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येत आहे. २४ हजार ५५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बुलंद एकबाल यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जनता दलाचे मुस्तकीम डिग्नीटी तर काँग्रेसचे मोहंमद फारूख कुरैशी यांच्यात सरळ सामना होत आहे. मोहंमद इम्रान शकील अहमद अन्सारी, अब्दुल खालीक गुलाब मोहंमद मोबीन व मोहंमद इस्माईल जुम्मन अन्सारी हे तिघे अपक्ष लढत आहेत.या प्रभागात १२ हजार १०६ महिला, तर १२ हजार ४०८ पुरुष असे २४ हजार ५१४ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन कापडणीस कामकाज पाहत आहेत. एटीटी हायस्कूल, शेख अब्दूल वदूद विद्यालय, जे.ए. टी. गर्ल्स हायस्कूल, महापालिका उर्दू शाळा क्र. १, पारसी सोडा वॉटरजवळील शाळा क्र. ३३ मधील मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू आहे.अत्यंत प्रतिष्ठेच्या होत असलेल्या प्रभाग क्र. १२ ड च्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. परिसरात मतदान प्रक्रिया काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण लक्ष ठेवून आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीसाठी मंडप, पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक