मालेगाव महापालिकेचे ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:35+5:302021-02-26T04:21:35+5:30

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त दीपक कासार यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकीय विशेष महासभेचे ...

Malegaon Municipal Corporation's budget of 428.60 crores | मालेगाव महापालिकेचे ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक

मालेगाव महापालिकेचे ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक

googlenewsNext

महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त दीपक कासार यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकीय विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेच्या प्रारंभी मुख्य लेखापाल कमरुद्दीन शेख यांनी अंदाजपत्रकातील विशेष तरतुदींची माहिती सभागृहाला दिली. यानंतर प्रशासनाच्या वतीने सभापती जाधव यांच्याकडे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका प्रशासनाने कुठलीही करवाढ न करता सन २०२०- २०२१ चे सुधारित व सन २०२१-२०२२ चे अंदाजपत्रक सादर केले आहे. या अंदाजपत्रकात अपेक्षित महसुली उत्पन्न २३५.१० कोटी धरण्यात आले आहे, तर अत्यावश्यक व प्रमुख बाबींवर अपेक्षित खर्च २२४.४३ कोटी, शहरातील सांडपाणी व्यवस्थापन व नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी भांडवली खर्चापैकी २५ टक्के खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. तसेच ५ टक्के निधी दिव्यांगांच्या सोयी-सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यापूर्वी कार्यारंभ आदेश दिलेली मात्र अपूर्ण आहेत अशी कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर कोरोनाच्या संसर्गामुळे प्रलंबित राहिलेल्या कामांसाठी ११ कोटींची स्वतंत्र तरतूद या अंदाजपत्रकात सुचविण्यात आली आहे. ७० कोटी स्पिल ओहव्हरमध्ये ठेवण्यात आले आहेत. अंदाजपत्रकातील तूट भरण्यासाठी हा निधी कामी पडणार आहे. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस, राजू खैरनार, शेख, कैलास बच्छाव, जयपाल त्रिभुवन, नगरसचिव श्याम बुरकूल आदींसह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

इन्फो

अंदाजपत्रकावर सोमवारी चर्चा

अंदाजपत्रक सादर केल्यानंतर महासभा तहकूब करण्यात आली. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर सोमवारी पुन्हा चर्चा केली जाणार आहे. स्थायी समिती या अंदाजपत्रकात सुधारणा व वाढ करण्याची शक्यता आहे. यानंतर महासभेपुढे अंतिम मंजुरीसाठी अंदाजपत्रक ठेवले जाणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात शासन निधी ग्राह्य धरून फुगवट्याचे ४२८ कोटींचे अंदाजपत्रक झाले आहे.

इन्फो

खालीद परवेझ यांचा सभात्याग

नगरसेवक डॉ. खालीद परवेझ यांनी प्रशासनाच्या अंदाजपत्रक सादर करण्याच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने स्थायी समिती सदस्यांना देखील अंदाजपत्रक सादर करताना सोबत घेतले पाहिजे होते. परंपरा खंडित केल्याचे त्यांनी म्हटले. अंदाजपत्रकाला त्यांनी विरोध करत सभात्याग केला.

फोटो- २५ मालेगाव एनएमसी

मालेगाव मनपाचे ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्याकडे सादर करताना मनपा आयुक्त दीपक कासार, मुख्य लेखापाल कमरुद्दीन शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, राजू खैरनार, श्याम बुरकूल आदी.

===Photopath===

250221\25nsk_39_25022021_13.jpg

===Caption===

फोटो- २५ मालेगाव एनएमसीमालेगाव मनपाचे ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्याकडे सादर करताना मनपा आयुक्त दीपक कासार,मुख्यलेखापाल कमरुद्दीन शेख,उपायुक्त नितीन कापडणीस, राजू खैरनार, शाम बुरकुल आदी. 

Web Title: Malegaon Municipal Corporation's budget of 428.60 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.