शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावचा पारा ४३ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:15 IST

शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते.

मालेगाव : शहर व तालुक्यात उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी मालेगावचे तपमान ४३ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वाधिक तपमानाची नोंद मानली जाते.  गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर व तालुक्याच्या तपमानाने चाळिशी पार केली  आहे. दररोज तपमानात वाढ होत असल्याने नागरिक उन्हाच्या तीव्रतेमुळे हैराण झाले आहेत. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. भरउन्हात आप्तेष्ट नातेवाइकांची लग्नांना हजेरी लावण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे. दुपारच्या सत्रात कडक ऊन असल्यामुळे नागरिक उपरणे, टोपी, गॉगल आदींचा आधार घेत उन्हापासून बचाव करीत आहेत.  उन्हामुळे विकारांमध्येही वाढ झाली आहे. आबालवृद्धांना उन्हाचा त्रास होत आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाढत्या उन्हामुळे मजूर कामाला येण्यास नकार देत आहेत. शेत शिवारातील विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांचा व पिकांचा पिण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. बहुतांशी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तर बारा गाव योजना, २६ गाव योजना, माळमाथा पाणीपुरवठा आदी योजनांद्वारे आठ-आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  माळमाथा व काटवन भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक दिसून येत आहे. तालुक्यातील सातही लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेत अशीच वाढ  होत राहिली तर जनजीवनावर विपरित परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.बर्फापासून व्हा सावध !उन्हाच्या तीव्रतेने जिवाची काहिली होत असल्यामुळे मालेगावकर दिलासा मिळवण्यासाठी शीतपेय व बर्फाचा वापर असलेले पदार्थ सेवन करताना दिसून येत आहेत; मात्र बर्फामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बर्फाची शुद्धता व दर्जाबाबत साशंकता आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहावे यासाठी भरपूर पाणी प्यावे; मात्र उन्हातून आल्यास तत्काळ फ्रीज किंवा माठामधील पाणी पिणे टाळावे. काही वेळ शांत बसल्यानंतर हळूहळू पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच जास्त वेळ घराबाहेर उन्हात राहणाऱ्या लोकांनी उसाचा रस किंवा अन्य प्रकारच्याफ ळांचा रस पिणे टाळावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :Temperatureतापमान