शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापौर-उपमहापौरांची उद्या निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:02 IST

मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. या औपचारिक निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.

मालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख व उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी (दि. १२) रोजी महापालिकेच्या सभागृहात महापौर - उपमहापौरांची निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. या औपचारिक निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.गुरूवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस. भुवनेश्वरी उपस्थित राहणार आहेत. त्यांना मनपा आयुक्त किशोर बोर्डे, नगरसचिव राजेश धसे सहाय्य करणार आहेत. महापालिकेत पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना व काँग्रेसची सत्ता येणार आहे. काँग्रेसकडे २९ तर शिवसेनेकडे १३ सदस्य आहेत. भाजपाच्या ९ सदस्यांचेही बळ मिळाल्याने काँग्रेस - सेना - भाजपचे सभागृहातील संख्याबळ ५१ झाले आहे. तर महागठबंधन आघाडीकडे व एमआयएमकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे निवडणुकीतील चुरस राहिलेली नाही. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार ताहेरा शेख यांच्या विरोधात महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद, एमआयएमच्या सादिया लईक हाजी यांनी महापौर पदासाठी नामांकन अर्ज भरला आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे निलेश आहेर यांच्या विरोधात महागठबंधन आघाडीचे अन्सारी अमानतुल्ला पीरमोहंमद, एमआयएमचे शेख माजीद मो. युनुस यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. सभागृहात होणाऱ्या या तिरंगी लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. महापालिकेच्या नगरविकास विभागाने महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक काळात महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महापालिकेसमोरील रस्ता लोखंडी जाळ्या लावून अडविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक