शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावची मका खरेदी योजना अडकली वादाच्या भोवºयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:52 IST

मालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे असहकार्य : शेतकी संघ अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : प्रशासनाचे असहकार्य, बारदानाचा अभाव तसेच शेतकी संघाचे व्यवस्थापक, सेवक यांच्या नियोजनाअभावी येथील मका खरेदी योजना प्रारंभापासून वादाच्या भोवºयात सापडली असून, त्यामुळे शेतकºयांची हेळसांड झाली आहे.दीड महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करूनही अनेक शेतकºयांचा मका मोजला गेला नाही. शिवाय तालुक्यात केंद्र शासनाचीकिमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी योजना बंद झाली. या कुचकामी योजनेमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकºयांना आर्थिक डबघाईस सामोरे जावे लागतआहे.उघड्यावर पडलेल्या मक्याचे नुकसानशेतकरीहिताच्या योजना तत्काळ राबवल्या जात नसल्याने सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाचा प्रकोप, कोरोनाचे सावट अशा चक्रव्यूहात सापडलेला बळीराजा धास्तावला आहे. शासनाने योजनेची घोषणा केली नसती तर शेतकºयांनी मिळेल त्या दरात मका विक्री केली असती. आज मोजणी होईल, उद्या होईल या आशेवर बळीराजा होता; मात्र दररोज फक्त आठ ते दहा शेतकºयांचा मका मोजला जात होता. एक पोते मका मोजण्यासाठी ३० रुपये वसूल केले जात होते, अशी कैफियत एका शेतकºयाने मांडली.मका खरेदी होत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांच्या जीवनाशी खेळ होत आहे. उघड्यावर पडलेला मकाचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने खराब होत चाललेल्या मका पिकाचे काय करावे, या समस्येने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. शेतकºयांची अवस्था चिंताजनक असून, सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटात सापडलेला शेतकरी भरडला जात आहे.आर्थिक कोंडीकोरोना पार्श्वभूमीमुळे लॉकडाऊनच्या काळात लिलाव बंद होते. माल विकला जात नाही. शेतकरी मरणयातना भोगत असताना शेतमाल विकला जात नव्हता. तसेच शेतकºयाची आर्थिक कोंडी झाली असताना शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शेतकºयांसाठी असलेला योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे न करता अडथळे निर्माण होत आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करण्याची मागणी होत आहे.योजना यशस्वी करण्यासाठी नियोजन व इच्छाशक्तीची आवश्यकता होती. मात्र मका मोजणीसाठी शेतकºयांना अतोनात त्रास सहन करावा लागला. तीन-चार दिवस नंबर लावून थांबण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली. मका मोजणी योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. खुल्या बाजारात १३०० पर्यंत दर मिळतो आहे. ५०० रुपये जास्त दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी हतबल झाला आहे. इतक्या वेळखाऊ आणि त्रासदायक योजना नको असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार