शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गाफील यंत्रणेमुळे मालेगाव हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:26 IST

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा दिवसांत २५८ वर जाऊन पोहोचला असून, आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषित केल्यानंतरही गाफील राहिलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, गेल्या तीन-चार दिवसांत बाधितांचा आकडा वाढतच चालल्याने परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे. त्यामुळे आता खांदेपालट करत सरकारही सतर्क झाले आहे.  पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्चला लॉकडाउन घोषित केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण निफाड तालुक्यात आढळून आला होता. त्यापाठोपाठ नाशिक शहरात एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी मालेगावमध्ये एकाच वेळी ५ रुग्ण कोरोनाबाधित आढळले तर पहिला बळीही मालेगावच्याच बाधित रुग्णाचा गेला. ८ ते २९ एप्रिल या २२ दिवसांच्या कालावधीत तब्बल २५८ बाधित रुग्ण आढळून आले असून, कोरोनाने १२ जणांचा बळी घेतला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील कार्यक्रमांशी कनेक्शन असलेल्या लोकांना तात्काळ क्वॉरण्टाइन करण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गाफील राहिली. त्यामुळे आता सद्यस्थितीत त्याचा उद्रेक मालेगावमध्ये पाहायला मिळतो आहे.इन्फोलॅब सुविधेमुळे चाचण्या जलद जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने प्रारंभी पुणे येथे लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर शासनाने धुळे येथे लॅब कार्यान्वित केली. आता नाशिकलाच मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात लॅबची सोय झाली असून, एका दिवसात १८०हून अधिक तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत. या जलद तपासणीमुळेही आता मालेगावमधील वाढता प्रसार समोर येत आहे.--------------शासनालाही उशिराने शहाणपण सुचले आणि अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्या उचलबांगड्या करण्याची नामुष्की ओढवली. दाट लोकवस्तीतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती करण्यातही यंत्रणा कमी पडली.  या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव आता हॉटस्पॉट तर बनले आहेच शिवाय मुंबई, पुण्यापाठोपाठ हिटलिस्टमध्येही आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी जिल्हा दौरा करत यंत्रणा हलवली आहे, त्यामुळे कोरोनाची बाधा काहीअंशी कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. शासनालाही उशिराने शहाणपण सुचले आणि अपर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी यांच्या उचलबांगड्या करण्याची नामुष्की ओढवली. दाट लोकवस्तीतील लोकांशी सुसंवाद साधत त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती करण्यातही यंत्रणा कमी पडली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव आता हॉटस्पॉट तर बनले आहेच शिवाय मुंबई, पुण्यापाठोपाठ हिटलिस्टमध्येही आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी जिल्हा दौरा करत यंत्रणा हलवली आहे, त्यामुळे कोरोनाची बाधा काहीअंशी कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक