शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मालेगाव : चार बंबांनी आणली आग आटोक्यात जळगाव चोंढीनजीक ट्रक जळून भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:20 IST

मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक सकाळी साडेसहा वाजता आगपेट्या भरलेल्या ट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. मनपाच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देकाही वेळातच रौद्ररूप धारणट्रक पूर्णपणे जळून खाक

आझादनगर : मालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक सकाळी साडेसहा वाजता आगपेट्या भरलेल्या ट्रकला अचानक आग लागून तो जळून खाक झाला. मनपाच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.तामिळनाडू येथून जयपूर येथे आगपेट्या भरून जात असलेल्या ट्रकला (क्र. टीएन ३४ डब्ल्यू ४७८६) सकाळी साडेसहा वाजता मालेगाव तालुक्यातील जळगाव चोंढीनजीक अचानक आग लागली. याची माहिती जवळील पेट्रोलपंप चालकास कळताच त्यांनी तालुका पोलिसांना याची माहिती दिली. तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी सदर माहिती मनपाच्या अग्निशमन दलास देत घटनास्थळी धाव घेतली.मालेगाव महानगरपालिकेच्या चार बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु मालेगावपासून घटनास्थळ लांब असल्याने बंबांना वेळ लागल्याने व ट्रकमध्ये आगपेट्या असल्याने आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करून ट्रक आपल्या कवेत घेतला. त्यामुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून सहकाºयांसह पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.प्रसंगावधानामुळे ट्रकचालकाचे प्राण वाचलेमालेगाव-मनमाड रस्त्यावर जळगाव चोंढीनजीक अचानक आगपेटीच्या ट्रकला आग लागली. यावेळी ट्रकचालक युवराज मुरकेशन याने प्रसंगावधान राखून ट्रकमधुन उडी घेतली. यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल आगीत जळून खाक झाला. ट्रकमालक नागराज रंगास्वामी, रा. कुटीपिंटमंगळ (तामिळनाडू) याने तालुका पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी अकस्मात घटनेची नोंद केली.