मालेगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दोघा जणांना नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. एका जणाला वर्षासाठी हद्दपार केले आहे.प्रांताधिकारी शर्मा यांनी गुरुवारी तिघा जणांना दणका दिला आहे. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अल्ताफ अहमद मोहंमद हारुण ऊर्फ अल्ताफ अंडे (१९) रा. मुस्लीमपुरा, जहीर अहमद अल्ताफ अहमद ऊर्फ चुटका (३०) रा. कुंभारवाडा या दोघांना चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, तर मोहंमद रिजवान शब्बीर अहमद ऊर्फ रिजवान चोरवा (२१) रा. नवी वस्ती, गोल्डननगर यास नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आणखी दोघा जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे. येत्या दोन दिवसात त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे.
मालेगावचे तिघे दोन वर्षासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:58 IST