लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे कार्य सर्व अभियंत्यांसाठी स्फूर्ती दायक व प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन मालेगाव प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष कलविंदरसिंग आसी यांनी केले.येथील बॅरिस्टर गोपालचंद्र संकुल मोसम पूल कार्यलयाच्या सभागृहात राज्याचे कृषिमंत्री अभियंता दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव प्रोफेशनल सिव्हील इंजिनियर असो. व मालेगाव प्रोफेशनल सिव्हील इंजिनियर सोशल अँड वेल्फेअर असो.च्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला. कलविंदरसिंग आसी आणि उपाध्यक्ष गौतम साकला यांच्या हस्ते पुप्रतिमपूजन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष आसी, चेतन कांकरिया, हेमंत हिरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी असो. च्या वतीने संस्थापक अध्यक्ष सर्जेराव पवार व सूर्यकांत वराडे यांच्यासह सचिव मनोज पगारे, देवराम हिरे,विवेक देवरे, भगीरथ आसदेव, निलेश कुलकर्णी, भालचंद्र निकुंभ, चेतन कांकरिया, दीपक मोदी, प्रशांत कुलकर्णी, सुनील घोडके, हेमंत हिरे आदीं उपस्थित होते. मनोज पगारे यांनी आभार मानले.
मालेगावी अभियंता दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:02 IST
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे कार्य सर्व अभियंत्यांसाठी स्फूर्ती दायक व प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन ...
मालेगावी अभियंता दिन साजरा
ठळक मुद्देमालेगाव : मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे कार्य सर्व अभियंत्यांसाठी स्फूर्ती दायक व प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन मालेगाव प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष कलविंदरसिंग आसी यांनी केले.