शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ईद-ए-मिलाद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:36 IST

मालेगाव मध्य : प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आॅल इंडिया सुन्नी जमियत उलमाच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पोलिस बंदोबस्तात मिरवणूक शांततेत पार पडली.

मालेगाव मध्य : प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आॅल इंडिया सुन्नी जमियत उलमाच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पोलिस बंदोबस्तात मिरवणूक शांततेत पार पडली. मिरवणुकीचा समारोप ए. टी. टी. हायस्कूलच्या प्रांगणावर झाला. याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी प्रमुख मौलवींचा सत्कार केला. यावेळी मौलाना अहमद रजा मिस्बाही, मुफ्ती वाजीद अली, मौलाना नसिमुल कादरी आदिंची भाषणे झाली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करून पैगंबर जयंती साजरी करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र प्रातिनिधीक स्वरूपात मिरवणूक काढण्याची भूमिका मौलवींच्या वतीने घेण्यात आल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. काल अवघ्या १० जणांना मिरवणुकीत सहभागी होण्याच्या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली. त्यानुसार आज सकाळी इस्लामपुरा येथील मदरसा हनफीया सुन्नीया येथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोजक्या मौलवींच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. मछली बाजार, कुसुंबा रस्ता, हजारखोली, नयापुरा, आझादनगर, चंदनपुरी गेट मार्गे ए. टी. टी. विद्यालयाच्या प्रांगणावर मिरवणुकीे सभेत रूपांतर झाले. मिरवणुकीस प्रथम पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नागरिकांची द्विधा मनस्थिती असल्याने मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी घेण्याचे टाळले; परंतु मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानींसह रस्ते सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक