शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णय २० वर्षांवरील रिक्षा-टॅक्सींना जिल्ह्यात बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:19 IST

मालेगाव : जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्ह्यातील आॅटोरिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांची वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देजप्तीची कारवाई करण्यात येणारपरमीट जमा करावे

मालेगाव : जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्ह्यातील आॅटोरिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांची वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. १ जुलै २०१८ नंतर २० वर्षांवरील आॅटोरिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी रस्त्यावर चालताना आढळून आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.वाहनांचा परवाना वैध असला तरीही ३० जून २०१८ पर्यंत नवीन वाहन किंवा २० वर्षाखालील दुसरे वाहन या परवान्यावर नोंद केल्याशिवाय परवान्याच वापर करता येणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता व जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बसेस व स्कूल व्हॅनसाठी १५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मूळ नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांना स्कूल बसचा परवाना दिला जाणार नाही. अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास अटकावून ठेवण्यात येतील. आजमितीस अशी वाहने रस्त्यावर असणाºया सर्व वाहनधारकांनी ३० जून पर्यंत आपल्या वाहनाच्या भवितव्याबाबत निर्णय घ्यावा. नवीन वाहन खरेदी करावे किंवा आपले परमीट जमा करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी केले आहे.मालेगाव तालुक्यातील सुमारे २३० आॅटोरिक्षा आणि ४७५ काळी-पिवळी टॅक्सी या २० वर्षांपूर्वीच्या आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसेस व स्कूल व्हॅनसाठी १५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मूळ नोंदणीपासून १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांना स्कूल बसचा परवाना दिला जाणार नाही. अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास जप्त केली जाणार आहे. १ जुलै २०१८ नंतर २० वर्षांवरील आॅटोरिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी रस्त्यावर चालताना आढळून आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीडकर यांनी सांगितले.