शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : महागठबंधनच्या २७ नगरसेवकांना पक्षादेश विरोधक सरसावले आयुक्तांच्या मदतीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:18 IST

आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेचे महापौर- आयुक्तांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनपातील विरोधक आयुक्तांच्या बाजुने सरसावले आहेत. येत्या महासभेत सत्ताधाºयांकडून आयुक्तांच्या ...

ठळक मुद्देविरोधात प्रस्ताव आणण्यात येऊ शकतो रशीद शेख व संगिता धायगुडे यांच्यात चकमक

आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेचे महापौर- आयुक्तांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनपातील विरोधक आयुक्तांच्या बाजुने सरसावले आहेत. येत्या महासभेत सत्ताधाºयांकडून आयुक्तांच्या किंवा ‘त्या’ आदेशाच्या विरोधात एखादा प्रस्ताव आणण्यात येऊ शकतो असे गृहित धरुन महागठबंधन आघाडीचे गटनेता बुलंद एकबाल यांनी महाआघाडीच्या २७ नगरसेवकांना पक्ष आदेशच बजावला आहे. त्यामुळे महापौर-आयुक्त यांच्यातील वादात विरोधी पक्षाने अप्रत्यक्षपणे उडी घेतल्याने वाद मिटण्यऐवजी अधिक चिघळण्याची शक्यता आहे.गेल्या बुधवारी सकाळी अंदाज पत्रकात निर्धारीत करण्यात आलेल्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी महापौर रशीद शेख यांच्या दालनात गटनेते, नगरसेवक व अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत आयुक्तांकडून विकास कामांबाबत अटीशर्ती लावण्यात आल्यावरुन महापौर रशीद शेख व आयुक्त संगिता धायगुडे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती. त्यातच गुरूवारी सायंकाळी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत शहर हितासाठी आपल्या भूमीकेवर ठाम असल्याचे जाहीर केल्याने महापौरांसह सत्ताधाºयांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे येत्या मासिक सभेत सत्ताधाºयांकडून आयुक्तांच्या कार्यपद्धती किंवा ‘त्या’ आदेशाच्या विरोधात एखादा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी जनता दलाकडून विकासकामांचे तुकडे पाडण्यात येऊ नये, गुणवत्तापूर्वक कामे व्हावीत यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे विरोधकांसाठी चालुन आलेल्या संधीचे सोनं करुन घेण्याची वेळ न दडवता महागठबंधन आघाडीचे गटनेता बुलंद एकबाल यांनी महागठबंधनच्या २७ नगरसेवकांना अशा प्रकारे प्रस्ताव आल्यास त्याचे समर्थन न करण्यासाठी पक्ष आदेश बजावला आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात विरोधकांनी अप्रत्यक्षपणे उडी घेतल्याने या वादात अधिक भर पडली असून वाद चिघळणार आहे.