सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या जय विष्णू राठोड (१४) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.माळेगाव वसाहतीत मुरु म उकरल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. अतिवृष्टीमुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साठलेले असून, जय राठोड हा शनिवारी दुपारी मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी आरडाओरड करीत घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. राठोड याला नागरिकांनी तत्काळ पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. नगरपालिका रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माळेगावी बालकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 01:06 IST