शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : भाजपाच्या सत्तेच्या वारूला लगाम; कॉँग्रेसचे मनपावर वर्चस्व

By admin | Updated: June 15, 2017 00:27 IST

शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाले उपमहापौरपदअतुल शेवाळे ।

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : केंद्रात व राज्यात भाजपाच्या सत्तेचा वारू चौफेर उधळत असताना, शिवसेना व कॉँग्रेसने युती करून महापालिकेवर सत्ता मिळवित भाजपाच्या विजयी घोडदौडीला लगाम घातला आहे. एमआयएमची अप्रत्यक्षरीत्या रसद घेत कॉँग्रेसने महापौरपद, तर शिवसेनेने उपमहापौरपद पटकावले आहे. शहराच्या पूर्व भागात माजी आमदार रशीद शेख व पश्चिम भागात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. भाजपाच्या दोघा नगरसेवकांची अनुपस्थितीही कॉँग्रेस व शिवसेनेच्या पथ्यावर पडली.महापालिकेची निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. महापालिकेत ८४ नगरसेवक निवडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे रशीद शेख व आमदार आसिफ शेख यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली होती, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनता दल आघाडीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मनपाच्या इतिहासात शिवसेनेला महत्त्वाचे असलेले उपमहापौरपद आजपर्यंत मिळाले नव्हते. सखाराम घोडकेंसारख्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवकाला उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वीदेखील त्यांनी उपमहापौरपद भूषविले आहे. उपमहापौरपदाची संधी मिळाल्यामुळे शिवसेनेचे पश्चिम भागात वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भाजपाने या निवडणुकीत पहिल्यांदाच खाते उघडले होते. मात्र कॉँग्रेस व शिवसेनेच्या युतीमुळे भाजपाची कोंडी झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनता दल आघाडीसोबत जाऊनही भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार सुनील गायकवाड यांना माघार घ्यावी लागली, तर भाजपाचे विजय देवरे व दीपाली वारुळे हे दोन नगरसेवक महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहिले. ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनता दल, भाजपा मॅजिक आकडा गाठू नये म्हणून कॉँग्रेस व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरीत्या तोडफोडीचे राजकारण करून महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे. राज्याच्या राजकारणात कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे, तर शिवसेना-भाजपाचीही युती आहे. असे असताना मनपा निवडणुकीत मित्रपक्ष असलेले हेच पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले होते.पूर्व भागातील राजकारणात विद्यमान महापौर रशीद शेख यांचा वरचष्मा असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर पश्चिम भागातही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा करिष्मा असल्याचे दिसून आले आहे. पंचायत समिती निवडणुकीतील पराभवाचा वचपा सेनेने महापालिका निवडणुकीत काढला आहे.या घडामोडीत कॉँग्रेस शिवसेनेला गळाशी लावण्यास यशस्वी झाली होती. शिवसेना व कॉँग्रेसने युती केल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसची कोंडी झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाशी बोलणी करून महापौरपदासाठी पाठिंबा मिळविला; मात्र त्यांना सत्तेचा मॅजिक आकडा गाठता आला नाही. एमआयएमचे ज्येष्ठ नेते युनूस ईसा यांनी राजकीय खेळी करत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका बजावून माजी आमदार रशीद शेख यांच्याशी असलेला ‘दोस्ताना’ कायम ठेवला. केंद्रात व राज्यात भाजपाच्या सत्तेच वारूचौफेर उधळत आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी सत्ता मिळविण्यात भाजपाला यश आले असताना मालेगाव महापालिकेत मात्र भाजपाला चमत्कार दाखविता आला नाही. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुत्सद्दीगिरीचे राजकारण करत शिवसेनेकडे महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच उपमहापौरपद खेचून आणले आहे.