शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव @ ४०.२ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:16 IST

शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. मालेगावचा पारा ४०.२ अंश सेल्सीअसवर पोहोचला आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच तपमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे शहर परिसरातील जनजीवन दुपारच्या सत्रात विस्कळीत होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.

मालेगाव : शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. मालेगावचा पारा ४०.२ अंश सेल्सीअसवर पोहोचला आहे.उन्हाळ्याच्या प्रारंभीच तपमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे शहर परिसरातील जनजीवन दुपारच्या सत्रात विस्कळीत होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. दुपारच्या सत्रात रस्ते निर्मनूष्य होत आहे. सायंकाळपर्यंत कमालीचा उकाडा जाणवत होता. मार्च महिन्याच्या शेवटीच उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. एप्रिल व मे महिन्यात तपमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उन्हाचा अबालवृद्धांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, उपरणे आदिंचा उपयोग करीत आहेत. सोमवारी पारा थेट ३८ अंशांपर्यंत सरकल्याने अंगाची काहिली झाली. दुपारी १ पासून ते ४ वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. रविवारी कमाल तपमानाचा पारा ३७ अंशांपुढे सरकला होता; मात्र किमान तपमान कमी असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता व सूर्यास्त होताच उष्ण वातावरण तितक्याच वेगाने थंड होत होते. रात्री काही भागात थंड वाराही सुटल्याचे नागरिकांनी अनुभवले; मात्र सोमवारी कमाल व किमान तपमानात वाढ झाल्याने वाºयाचा वेग मंदावला व वातावरणात उष्माही जाणवत होता. वातावरणातील आर्द्रताही वाढू शकते, यामुळे उकाडा व घामाचा त्रास अधिक सहन करावा  लागण्याची शक्यता आहे. उन्हामुळे उष्मा वाढत असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.३१ मार्चपर्यंत उष्ण वातावरण वाढणार असून, नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे. गरज असल्यास बाहेर पडताना उन्हापासून बचावाची योग्य ती खबरदारी घ्यावी. घरातून निघताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :Temperatureतापमान