शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ७२१ सदोष पोलिओ लस सिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:09 IST

मालेगाव : गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाच्या पत्रान्वये येथील ७२१ पोलिओ लसचे डोस जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देलसीकरण मोहिमेपासून बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नसल्याची माहिती

मालेगाव : गेल्या काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेत दिलेली लस सदोष आढळून आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाच्या पत्रान्वये येथील ७२१ पोलिओ लसचे डोस जप्त करण्यात आले.यापूर्वी झालेल्या व होणाऱ्या लसीकरण मोहिमेपासून बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नसल्याची माहिती सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, जागतिक आरोग्य संघटनेचे मो. अब्दूल हलीम अझहर व डॉ. मिसम अब्बास यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत घेण्यात येणारी पी-२ लस सन २०१६ पासून बंद करण्यात आली होती. या लसीची गरज नसल्यामुळे आरोग्य विभागाने लस देणे बंद केले होते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आलेली पी-२ ची लस बायोमेड कंपनीकडून महाराष्टÑ, उत्तरप्रदेश, तेलंगणा राज्यात पुरवठा करण्यात आली होती. सदर लस ही सदोष असल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने १० सप्टेंबर २०१८ रोजी येथील सामान्य रूग्णालयाला पत्र दिले होते. बंदी असलेल्या लसीचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सामान्य रूग्णालयात असलेल्या ७२१ व्हाईल जप्त करण्यात आल्या आहेत. एका व्हाईलमधून १७ बालकांना डोस दिला जातो. यापूर्वी देण्यात आलेल्या डोसमुळे बालकांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. किशोर डांगे यांनी केले आहे.