शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबाद प्रकल्पात अडीच एफएसआय मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:02 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीपी स्कीमचा (नगररचना योजना) प्रारूप मसुदा अखेर जाहीर करण्यात आला आहे. एकूण ३०६ हेक्टर क्षेत्रापैकी १६३ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना अंतिम भूखंड देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देटीपीचा प्रारूप मसुदा जाहीर । प्रिमीयमसह ३ चटई क्षेत्र, १६३ हेक्टरचे मिळणार भूखंड

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीपी स्कीमचा (नगररचना योजना) प्रारूप मसुदा अखेर जाहीर करण्यात आला आहे. एकूण ३०६ हेक्टर क्षेत्रापैकी १६३ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना अंतिम भूखंड देण्यात येणार आहे. याशिवाय बेटरमेंट चार्जेस, आर्थिक दुर्बलांसाठी घरे त्याचप्रमाणे रस्ते आणि अ‍ॅमेनिटी प्लॉटसाठी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांकडून जमीन न घेता कंपनीने त्यांच्या हिश्श्यातूनच जमीन दिली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या पथ्यावर पडले आहे.स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शनिवारी (दि.४) मखमलाबाद आणि नाशिक शिवारातील या प्रकल्पात बाधित शेतकºयांसाठी टीपी स्कीमचे सादरीकरण महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. यावेळी शेतकºयांच्या बहुतांशी शंकांचे निरसन करण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवारी (दि.४) कार्यक्रमाच्या ठिकाणी लेखी हरकत आणि सूचना करण्याची संधी देण्यात आली. यानंतरदेखील टीपी स्कीम प्रारूप नगररचना संचालकांकडून तपासून घेण्यात येणार असून, त्यानंतरदेखील हरकती आणि सूचनांसाठी अधिकृतरीत्या संधी देण्यात येणार आहे.मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकासासाठी स्मार्ट सिटी कंपनीने गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात महापालिकेच्या महासभेसाठी प्रस्ताव सादर केला होता. या योजनेअंतर्गत ३०६ हेक्टर क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देऊन नियोजनबध्द नगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना राबविण्यात येणार असून, त्याला ९ सप्टेंबर २०१९ रोजी महासभेत मान्यता देऊन नगररचना योजना राबविण्यासाठी इरादा स्पष्ट करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर नगररचना योजना राबविण्यासाठी एकूण ९ महिन्यांचा कालावधी असून, पहिल्या टप्प्यात नगररचना योजना तयार करण्यासाठी मसुद्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. तर प्रकल्प रद्द होणारस्मार्ट सिटीने केलेल्या सादरीकरणानंतर आता टीपी स्कीमच्या प्रारूपाची तांत्रिक छाननी नगररचना संचालकांमार्फत करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर राजपत्रात हा मसुदा प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती आणि सूचना घेण्यासाठी एक महिन्याची मुदत असेल. हरकती आणि सुनावणीनंतरच नगररचना योजना मंजूर होईल. मसुदा मंजूर झाल्यानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांनी योजनेला विरोध केला, तर संपूर्ण प्रकल्पच रद्द होईल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी