शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्सप्रेसचा ‘मेकओव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 16:50 IST

‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे.

ठळक मुद्देनव्या कोऱ्या २१ डब्यांसह नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू स्वागताची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली.

नाशिक : ‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे. स्वच्छता, सामाजिक सलोखा, लक्झरीअस आसनव्यवस्था आणि पाचवेळा लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या पासधारक बोगीचा लौकीक कायम राखत सकाळी ७.२० वाजता पंचवटी एक्सप्रेस आदर्श एक्सप्रेस नाशिकरोडहून मुंबईकडे रवाना झाली.नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या  चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्सप्रेस ही महत्वाची गाडी मानली जाते. १ नोव्हेंबर १९७५ पासून पंचवटी एक्सप्रेस दिमाखात धावत आहे. तब्बल ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सपे्रसचे रंगरूप बदलण्यात आले आहे. रेल्वेला भरघोस महसूल देणाºया पंचवटी एक्सप्रेसला रेल परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘आदर्श कोच’ निर्माण करण्यात आला होता.या कोचला सलग पाच वेळा लिम्का बुक आॅफ रॅकॉर्डमध्ये स्थान मिळाल्यानंतर याच बोगीच्या धर्तीवर संपुर्ण पंचवटी एक्सप्रेस आदर्श बनविण्यासाठी रेल परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आणि पंचवटी एक्सप्रेसला सर्वच्या सर्व २१ नवे डबे जोडण्यात आले.संपुर्ण नवीन डबे आणि आरामदायी कुशनयुक्त आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व डब्यांना बायोटोयलेट जोडण्यात आले आहे. दोन डब्यांना जोडणाºयांना कपलिंगला इंटरलिंक दरवाजे करण्यात आले आहे तर स्लाईडींग विंडो करण्यात आल्या आहेत. नवीन बोगी या अधिक वेगाने धावू शकणाºया असल्याने रेल परिषदेच्यावतीने पंचवटी एक्सप्रेसचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमित रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी ‘आदर्श पंचवटी एक्सप्रेस’साठी रेल्वेला सुचविलेल्या विविध कामांचा पाठपुरावा केला.नाशिकरोड स्थानकावर सकाळी आदर्श पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव घोलप, सुनील आडके, गुरमित रावल, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजू फोकणे आदिंसह पासधारक प्रवासी, रेल परिषदेचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.--इन्फो--स्वागताची औपचारिकतापंचवटी एक्सप्रेसला आदर्श करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या  बिपीन गांधी यांचे रेल्वेस्थानकावरच दुर्देवी निधन झाल्याने पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत अत्यंत साध्यापद्धतीने करण्यात आले. पंचवटीच्या स्वागतासाठी आगोदर जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोलताशा, पेढे वाटप करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र गांधी यांच्या अकाली निधनामुळे स्वागताची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली. 

टॅग्स :NashikनाशिकRailway Passengerरेल्वे प्रवासी