शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची आवड-निवड पाहूनच करा द्राक्ष उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:51 IST

कळवण : द्राक्षशेतीसमोर विक्र ी व्यवस्थेचे सर्वात मोठे आव्हान आहे. युरोपसह चीन, पूर्वोत्तर देश यासारख्या देशांत असंख्य संधी आहेत. ...

ठळक मुद्दे वाडी येथे द्राक्ष उत्पादकांना प्रशिक्षण

कळवण : द्राक्षशेतीसमोर विक्र ी व्यवस्थेचे सर्वात मोठे आव्हान आहे. युरोपसह चीन, पूर्वोत्तर देश यासारख्या देशांत असंख्य संधी आहेत. चिली, पेरू, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांत आपल्या बागेतील प्रत्येक घड निर्यातक्षम राहील या दृष्टीनेच नियोजन केले जाते. ग्राहकांची आवड, निवड, क्षमता याचा अभ्यास करूनच यापुढे द्राक्ष उत्पादनाकडे पाहावे लागणार आहे. ही जबाबदारी व्यापारी किंवा वितरकांवर न टाकता शेतकरी म्हणून पुढे येण्याची गरज असल्याचे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण जवळील वाडी बु. येथील निर्मल फार्मवर द्राक्ष पिकांच्या निर्यात, रोग व कीड व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद ढोकरे, मंगेश भास्कर, सुरेश कळमकर, कळवणचे उपनगराध्यक्ष कौतिक पगार, प्रगतशील शेतकरी गंगाधर पगार ,तालुका कृषी अधिकारी विजय पाटील आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना विलास शिंदे यांनी सांगितले की, व्यवसाय म्हणून शेती करण्याची गरज आहे.शेतीचे प्रश्न आता आपल्यालाच सोडायचे असून शास्त्रीय पध्दतीने शेतीचे नियोजन करु न उद्योग व्यवसाय म्हणून शेतीकडे पहावे. येत्या काळात गोड चवीबरोबरच जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन घेतले, तर भारतीय द्राक्षांना उज्ज्वल भवितव्य राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी तर अरु ण मोरे , डी.बी.राजपूत, डी.व्ही.साळुंखे यांनी द्राक्ष व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Nashikनाशिक