शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीला प्रदूषणमुक्त करा : भारती पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:54 IST

धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली. 

नाशिक : धार्मिक महत्त्व असलेल्या गोदावरी नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने प्रदूषण वाढले असून, गोदावरीसह नांदूर-मधमेश्वर येथे केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवून प्रदूषण मुक्ती साधण्याची मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली. गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून तिला दक्षिण गंगादेखील म्हटले जाते. परंतु वाढत असलेले जल प्रदूषण गोदावरीची समस्या बनले आहे. खूप साऱ्या कंपन्यांचे केमिकलयुक्त खराब पाणी या नदीपात्रात सोडले जाते. ज्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यामुळे त्वचेसंबंधीचे आजार होण्याची भीतीदेखील असते. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पानवेलींनी घेरलेले आहे असे  सांगून खासदार डॉ. भारती पवार यांनी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली.निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्य असून तेथे २०० पेक्षा अधिक जातींचे पक्षी येत असतात. त्याच ठिकाणी २५ पेक्षा अधिक माशांच्या प्रजाती देखील पहावयास मिळतात.  या नांदूर मध्यमेश्वरला रामसरमध्ये घोषित केले आहे. परंतु या क्षेत्रातही जल प्रदूषणाचा धोका वाढत आहे. यामुळे  केंद्र आणि राज्य सरकारमार्फत स्वच्छता अभियान राबवून गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी