शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सणाचे गोडधोड बनवा १६० ग्रॅम साखरेत

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

सणाचे गोडधोड बनवा १६० ग्रॅम साखरेत

नाशिक : राज्य सरकारची वर्षपूर्ती व त्याला लागूनच दिवाळी सण आल्याने यंदा दिवाळी जोरात होण्याची भाबडी आशा बाळगून असलेल्या गोरगरिबांच्या पदरी निराशाच पडली असून, सणासाठी गोडधोड करण्यासाठी रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना फक्त १६० गॅ्रम साखर अतिरिक्तदेण्यात येणार आहे. दिवाळी सणासाठी लाडू, करंजी, शंकरपाळे असे गोडधोड पदार्थ केले जातात; परंतु सध्या बाजारात साखरेचे भाव सामान्यांना परवडेनासे झाल्याने गोरगरिबांसाठी साखरेचे पदार्थ खाणेच काय, पण तयार करणेही अशक्य असल्याचे पाहून राज्य सरकारने दिवाळी सणासाठी गोरगरिबांना स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अन्नपूर्णा, अंत्योदय व अन्नसुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मिळणार असून, प्रति माणसी फक्त १६० ग्रॅम अतिरिक्त साखर दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी नोव्हेंबर महिन्यासाठी १४१०१ मेट्रीक टन साखर मंजूर करण्यात आली असून, साखरेसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दरमहा मिळणारी ५०० ग्रॅम व त्यावर सणाची अतिरिक्त१६० ग्रॅम अशा प्रकारे ६६० ग्रॅम साखर रेशनमधून येत्या दोन दिवसांत वाटप केली जाणार आहे. खुल्या बाजारात साखरेची काहीही किंमत असली तरी, रेशनमधून १३ रुपये ५० पैसे या दरानेच ती दिली जाणार असली तरी, १६० ग्रॅम साखरेत दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शिधापत्रिकांना पडला आहे. शासनाने त्यांच्या वर्षपूर्तीनिमित्त किमान प्रती मानसी एक किलो साखर स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)