शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तक्रार करा; १०० मिनिटांत होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:33 IST

निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठेवता येणार आहे.

नाशिक : निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठेवता येणार आहे. आयोगाने सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे मोबाइल अ‍ॅप नागरिकांना केवळ निवडणूक काळासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार या अ‍ॅपद्वारे केल्यास अवघ्या १०० मिनिटांत संबंधितावर कारवाई करण्याचा दावा आयोगाने केला आहे.निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन झाल्यास नैतिक मार्गाने आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया होऊन लोकशाहीतील या मोठ्या उत्सवात जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. या उद्देशाने आयोगाने सर्वसामान्यांना या सर्व घटनांवर नजर ठेवण्याचा अधिकारच या अ‍ॅपद्वारे बहाल केला आहे.यापूर्वी आचारसंहितेची तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारीची सत्यता तपासून पाहून त्यानंतर कार्यवाहीची प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा वेळ वाया जात होताच शिवाय अचारसंहिता भंग असल्याबाबतचे मतप्रवाहदेखील उमटत होते. यामुळे यंत्रणाला या प्रक्रियेसाठी चांगलीच धावाधाव करावी लागते.अशी असेल प्रक्रिया‘सी-व्हिजिल’ या मोबाइल अ‍ॅपवरून निवडणुकीचा खर्च आणि आचारसंहिता भंग करणाऱ्यांच्या तक्रारीचा पुरावा म्हणून नागरिकांसाठी शस्त्र ठरत आहे. सदर अ‍ॅप हे यूझर फे्रण्डली असून, त्याचा वापर अत्यंत सोपा आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते मतदानाच्या दुसºया दिवसांपर्यंत सदर अ‍ॅप कार्यरत राहणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून घटनेचे छायाचित्र, व्हिडीओ पुरावा म्हणून अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे जेथे कुठे आचारसंहिता भंग होत आहे असे दिसते त्या घटनेचे छायाचित्र आणि व्हिडीओ काढून जीपीएसप्रणालीद्वारे स्वयंचलित मॅपिंगसह अपलोड करण्याची सुविधा आहे. अशा प्रकारची कार्यवाही केल्यानंतर मोबाइलधारकाला युनिक आयडी क्रमांक त्याच्या मोबाइलवर येतो. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याला त्याची ओळख गोपनीय ठेवून तक्रार करता येणार आहे.अ‍ॅपवरून नोंदविलेली तक्रार अवघ्या पाच मिनिटांत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होणार आहे. तेथून सर्व तक्रारींचा तपशील हा भरारी पथकाकडे पाठविला जातो. त्यानुसार संबंधित पथक हे ‘जीव्हीआयजीआयएल’ नामक मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटांच्या आत पोहोचू शकते. तेथून तक्रारीची सत्यता पडताळून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल.तपास यंत्रणेकडून निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे अहवाल पाठविल्यानंतर घटनेतील तथ्य तसेच पुराव्यांच्या आधारे कार्यवाहीचा निर्णय घेतला जाणार आहे. कार्यवाहीची माहिती संबंधित तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेशाद्वारे दिली जाणार आहे.सी व्हिजिलचा उपयोग अत्यंत मर्यादित असून, या अ‍ॅपद्वारे घेतलेले चित्रण आणि फोटो हे आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करता येत नाहीत.अ‍ॅपद्वारे फोटो, व्हिडीओ अपलोड करण्याचा अवधी केवळ पाचच मिनिटांचा असेल.याचा वापर केवळ आचारसंहितेच्या तक्रारीसाठीच होऊ शकतो.चुकीच्या तक्रारी डिलीट करण्याचा अधिकार नियंत्रण कक्षाला असतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय