शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

आदिवासींसाठी स्वायत्त जिल्हे करा

By admin | Updated: July 10, 2014 18:38 IST

आदिवासींसाठी स्वायत्त जिल्हे करा

 

नाशिक : आदिवासी जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश केला तर राज्यातील ८५ विधानसभा मतदारसंघांत आदिवासी बांधव त्यांचा स्वतंत्र निर्णय घेतील, असा गर्भित इशारा देतानाच पूर्वेकडील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही आदिवासी बहुल लोकसंख्येच्या जिल्ह्णांना स्वतंत्र आदिवासी जिल्ह्णाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्याबाबत विधान केल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आरक्षण ठरविण्याचे अधिकार कोण्या एका व्यक्तीला आणि राज्याला नव्हे, तर त्यासाठी भारताची स्वतंत्र घटना आहे, असे सांगत पिचडांनी शरद पवार यांना घरचा अहेर दिला आहे. नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेण्यासाठी ते आले असता शासकीय विश्रामगृहावर निवडक पत्रकारांशी ते बोलत होते. धनगर समाजाचा समावेश आदिवासी समाजात करू नये असा आदिवासी बांधवांचा प्रयत्न आहे. आमचा कोणालाही आरक्षण देण्यास विरोध नाही. फक्त आदिवासी जमातीच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण देता कामा नये, असे पिचड यांनी सांगितले. कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याआधी व त्या-त्या संवर्गात विशिष्ट समाजाचा समावेश करण्यासाठी आधी मानव वंशाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांकडून त्यासंदर्भात माहिती मागविली जाते. तो अहवाल लोकसभेत सादर केला जातो व लोकसभेने मंजूर केल्यानंतरच त्याबाबत निर्णय होतो. केरळ आणि कर्नाटकात मराठा समाजाला आदिवासी आरक्षण लागू आहे, तर उत्तर प्रदेश व बिहारमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. मग धनगर समाज अनुसूचित जातीमध्ये जाण्याची का मागणी करीत नाही? त्यांना माहीत आहे, तेथे काही मिळणार नाही म्हणून ते आदिवासींच्या आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न करीत असून, याला राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार व खासदारांचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)