शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघाताचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:28 IST

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाती मृत्यू झाल्याचा पत्नीने केलेला बनाव आडगाव पोलिसांनी उघड केला आहे़ ३ आॅगस्ट २०१७ रोजी मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरू नानक पेट्रोलपंपासमोर शरद संपत साळवे (३७, रा. श्रीपाद अपार्टमेंट, रामनाथनगर, आडगाव शिवार) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी राणी शरद साळवे व तिचा प्रियकर अनिल ताठे या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

नाशिक : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून अपघाती मृत्यू झाल्याचा पत्नीने केलेला बनाव आडगाव पोलिसांनी उघड केला आहे़ ३ आॅगस्ट २०१७ रोजी मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरू नानक पेट्रोलपंपासमोर शरद संपत साळवे (३७, रा. श्रीपाद अपार्टमेंट, रामनाथनगर, आडगाव शिवार) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी राणी शरद साळवे व तिचा प्रियकर अनिल ताठे या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीत महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत पती शरद साळवे यांचा मृत्यू झाल्याचा बनाव पत्नी राणी साळवे हिने रचला होता़ तर वैद्यकीय अहवालात अपघातात नव्हे तर डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने साळवेचा मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला़ पोलिसांनी या प्रकरणी प्रथम अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून आपला तपास सुरू ठेवला़ या घटनेनंतर काही दिवसांनी शरदचे आई-वडील व भावाने पोलीस ठाण्यात त्याची पत्नी राणी तिचा प्रियकर केबल व्यावसायिक अनिल ताठे यांच्या विरोधात संशय व्यक्त केला़  आडगाव पोलिसांनी राणी साळवेचा जबाब घेतल्यानंतर त्यामध्ये तफावत आढळली, तर संशयित ताठे हा घटनेनंतर फरार होता़ शुक्रवारी ताठे शहरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास सापळा लावून अटक केली़ त्याची पोलीस स्टाईलने कसून चौकशी केल्यानंतर ताठेने राणीसोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली़ तसेच या प्रकरणाची शरदला भणक लागल्याने तो राणीवर लक्ष ठेवून असल्याने या दोघांना अडचण होत होती़ अखेर या दोघांनी प्लॅनिंग करून ३ आॅगस्टला रात्री शरद साळवे हा फ्लॅटमध्ये झोपलेला असताना डोक्यात वार करून त्याचा खून केला़२५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीराणी व ताठे या दोघांनी शरदचा खून केल्यानंतर मृतदेह महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला़ पोलिसांनीही प्रथमदर्शनी अपघाताचा गुन्हा दाखल केला़ मात्र तपासाअंती हा खून असल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली़ या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पुजारी, उपनिरीक्षक धनश्री पाटील, हवालदार संजीव जाधव, दत्ता खुळे, बोराडे यांनी ही कामगिरी केली़