शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१८५० रुपये दराने होणार मका खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:48 IST

सटाणा : तालुक्यातील डांगसौंदाणे येथे आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२०) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.

सटाणा : तालुक्यातील डांगसौंदाणे येथे आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२०) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.  नाशिक येथील प्रादेशिक महामंडळाने मका आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणाऱ्या या केंद्रावर महामंडळाच्या निकषात बसणारा कोरडा (सुकलेला) मका हमीभाव प्रतिक्विंटल रुपये १८५० या दराने खरेदी करण्यात येणार असून, हेक्टरी ३५ क्विंटल मका शेतकऱ्यांचा घेतला जाणार आहे. यासाठी नोंदणी आवश्यक असून, याबाबत केंद्रावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.  डांगसौंदाणे येथील सप्तशृंगी महाविद्यालयाच्या आवारात आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी मोरे, कळवणच्या उपप्रादेशिक अधिकारी सुवर्णा मोरे, ग्रेडर खैरनार, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, डॉ. सुधीर सोनवणे, भाजप तालुका उपाध्यक्ष अनंत दीक्षित, दिगंबर भदाणे, कैलास कोल्हे, सोपान सोनवणे, माजी सरपंच मोठाभाऊ सोनवणे, मनोहर सोनवणे, साहेबराव बोरसे, पंढाआप्पा सोनवणे, हिरालाल बाविस्कर, मनोहर सोनवणे, नंदू बैरागी, डांगसौंदाणे उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, सखाराम खैरनार, भिका कुंभार, गणेश सोनवणे, संतोष परदेशी, प्रभाकर सोनवणे, सुमेध चंद्रात्रे, रवींद्र सोनवणे, आबा गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.----------------डांगसौंदाणे येथील आदिवासी विकास महामंडळाचे गुदाम मोडकळीस आले आहे. त्याची आमदार बोरसे यांनी पाहणी करून लवकरच महामंडळामार्फत धान्य साठवणुकीसाठी अद्यावत गुदाम उभारण्यात येईल तसेच बुंधाटे येथे पश्चिम आदिवासी बांधवांसाठी लवकरच सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Nashikनाशिक