शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

खरिपावर मका, सोयाबीनची छाप

By admin | Updated: August 27, 2016 23:10 IST

बदलत्या पर्जन्यमानाचा ‘परिणाम’: ज्वारीच्या क्षेत्रात लाखाने झाली घट

 गणेश धुरी नाशिकबदलत्या पर्जन्यमानाने जिल्ह्यातील खरिपाचा पीक पेरणी पॅटर्नही बदलू लागला असून, कधी काळी दोन लाख हेक्टर लागवडीच्या घरात असलेली खरिपाची बाजरी यंदा अवघ्या सव्वा लाख हेक्टरवर मर्यादित राहिली आहे. त्या मानाने वाढत वाढत चक्क पावणे दोन लाख हेक्टरच्या घरात पोहोचलेल्या मका पिकाचे क्षेत्र दिवसागणिक वाढतच असून, यंदाच्या खरिपात ते चक्क सव्वादोन लाख हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. तीच बाब सोयाबीनच्या बाबतीत झाली असून, ४० हजार हेक्टरच्या आसपास मर्यादित असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र ६५ हजारांवर पोहोचले आहे. दोन वर्षांपासून सातत्याने घटलेले पर्जन्य आणि अचानक यावर्षी दमदार हजेरी असणाऱ्या पर्जन्यामुळे हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला असला तरी त्यामागील नगदी पिके घेऊन कमी काळात झटपट पैसा वसूल करण्याच्या भूमिकेतून हा खरिपाचा पीक पॅटर्न बदलल्याची चर्चा आहे.खरिपाच्या बाजरीवर संकटजिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर असून, यावर्षी पाऊस दमदार झाल्याने पेरण्याही शंभर टक्के झाल्या आहेत. असे असले तरी खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र कमी पर्जन्यामुळे सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दोन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची लागवड झाली होती. यावर्षी त्यामुळेच सरासरी लागवडीखालील क्षेत्र अचानक घटून ते एक लाख ६० हजार हेक्टर होते. त्यापैकीही एक लाख ३१ हजार ८२२ हेक्टरवरच बाजरीची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दोन वर्षांत दोन लाखांवरून खरिपाच्या बाजरीचे क्षेत्र घटून अवघे सव्वा लाख इतकेच झाले आहे. खरिपाचे यावर्षीचे पीकनिहाय सरासरी क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे, कंसात प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - भात - ६६,७०० (७७८१३), ज्वारी -३९०० (५७१), बाजरी -१,६०,२०० (१,३१,८२२), नागली - ३५३०० (२८३०५), मका - १,७३,००० (२,१८,२७३), इतर तृणधान्य - १३,६०० (१४७०५), तूर -१०४०० (१०७५४), मूग - १०३०० (१२३४२), उडीद - १४७०० (११२८८), इतर कडधान्य -१०,००० (६२२७), भूईमूग -३१३०० (२५९११), सूर्यफूल - १०० (२४), तीळ -०.७५ (९२), सोेयाबीन - ५७००० (६४६९९), खुरसणी - १५१००(८२५४), इतरगळीत - ३००० (५९१), कापूस - ४७२०० (४०७८०) असे एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ५१ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. धरणे ओव्हरफ्लोमागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण चांगले राहील, हा हवामान खात्याचा अंदाज पावसाच्या दमदार हजेरीमुळे यावेळी खरा ठरविल्याने जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती समाधानकारक झाली आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची सरासरी शिल्लक प्रमाण ८२ टक्के इतके आहे. ओझरखेड, तीसगाव, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर, केळझर, हरणबारी ही आठ धरणे ओव्हर फ्लो झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित धरणांमधील आॅगस्टअखेरचा उपयुक्त पाणीसाठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात पाण्याची टक्केवारी - गंगापूर -५०९१ (९१), पालखेड - ३७८ (५०), करंजवण -५२८२ (९८), वाघाड - २३०२ (९२), पुणेगाव - ५७० (९१), दारणा - ६३९४ (८९), नांदूरमध्यमेश्वर - २४८ (९६), चणकापूर -२१०८ (८७), पूनद - १२४५ (८९), गिरणा - १२३८० (६७) असे आहे. जिल्ह्यातील धरणात एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दलघफू इतकी असून, आॅगस्टअखेर त्यात ५३९०६ (८१ टक्के) दलघफू इतका पाणीसाठा आहे.