शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने मका पीक भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:23 IST

नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नांदगाव : गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून शेतातले बांध फुटले. तसेच वादळी वाºयामुळे मका, बाजरी पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शहरात चोवीस तासांत १९४ मिली पावसाची नोंद झाली. तालुक्याच्या काही भागात वादळी वाºयासह पावसाने झोडपल्याने फुलोरा येण्याच्या स्थितीतल्या मका व बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले. मूग, भुईमूग या पिकांना नत्र खताची गरज नाही. ते इतर खतांमधूनदेखील मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फक्त युरियाची मागणी करू नये. पिकाच्या सकस वाढीसाठी स्फुरद व पालाश या खनिजांची व झिंक, मग्नेशियम अशा मायक्रो घटकांची गरज असते. तालुक्यात ८० सीएससी सेंटर व ग्रामपंचायतीतील आपले सेवा केंद्र यांच्यामार्फत आतापर्यंत १५ हजार खातेदारांनी पीकविमा उतरविला असून, राहिलेल्या शेतकºयांनीदेखील २७ जुलैपर्यंत पीकविमा उतरवून घ्यावा. विम्यासाठी ३१ जुलैअखेरची तारीख आहे. शेतकºयांनी गर्दी करू नये अंतिम तारखेची वाट न पाहता पीकविमा उतरून घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.-------------------वणी परिसरात पावसाची जोरदार हजेरीगेल्या महिनाभरापासून किरकोळ हजेरीवगळता दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. अपवाद-वगळता पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण होते. सुरुवातीच्या पावसावर टमाटा लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. सोयाबीन, बाजरी, मका व इतर पिकांसाठी पेरणी केली होती. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. भात लावणी व संबंधित भातशेतीच्या कामांना अग्रक्र म देण्यात आला होता. सध्या मजुरांअभावी ही सर्व कामे घरातील कुटुंबीयांचे सदस्य आपल्या परीने करत होते. या पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना पर्जन्यराजा रु सून बसला. शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पर्जन्यराजाला साकडे घालत होता.

टॅग्स :Nashikनाशिक