सिडको : येथील उंटवाडी भागातील कल्पना पार्कमध्ये राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कल्पना पार्क येथे बाळासाहेब मथुरे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांची मुलगी किरण मथुरे (१७) ही बारावीमध्ये शिकत होती. दरम्यान, तिला सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी आई उठवायला गेली असता तिने राहत्या खोलीमध्ये गळफास लावल्याचे आढळून आले. अंबड पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत अकस्मात मृत्यूची घटना दाखल केली आहे. (वार्ताहर)
युवतीची आत्महत्त्या
By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST