नाशिक : ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणकडून फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. चांदवड उपविभागात याची सुरुवात झाली असून, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.चांदवड उपविभागात १२ शाखा कार्यालयांच्या अंतर्गत १०५ गावांचा समावेश होतो. येथील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे सुलभ व्हावे, यासाठी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून फिरते बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. दोन शाखा कार्यालयांच्या परिसरात मिळून एक दिवस असे रविवार वगळता इतर सहा दिवस उपविभागाच्या सर्वच परिसरात वीजबिल भरणा व्हॅन फिरविण्यात येणार आहे. विशेषत: आठवडे बाजारात परिसरातील ग्राहक एकत्रित येत असल्याने अशा ठिकाणी व्हॅन थांबवून वीजबिल भरून घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे.मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, प्रभारी अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे व कार्यकारी अभियंता मधुसुदन वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय लोखंडे व उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चांदवड बाजार समिती आवारात या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सहायक अभियंता राम इप्पर, कनिष्ठ अभियंता उदय पाटील, पंकज पगारे, समीर देशपांडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पुढील आठवड्यात सोमवारी चांदवड शहर, मंगळवारी वादळी-२ व शिवरे, बुधवारी वडनेरभैरव, गुरु वारी वादळी-१, शुक्रवारी काजी सांगवी व देवरगाव, शनिवारी दुगाव आणि शिंगवे याठिकाणी फिरते वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध राहणार आहे.
महावितरणचे पहिले फिरते वीजबिल भरणा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 16:58 IST
नाशिक : ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणकडून फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. चांदवड उपविभागात याची सुरुवात झाली असून, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.
महावितरणचे पहिले फिरते वीजबिल भरणा केंद्र
ठळक मुद्देग्राहकांची सुविधा : १०५ गावांतील नागरिकांना होणार लाभ१२ शाखा कार्यालयांच्या अंतर्गत १०५ गावांचा समावेश