शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

महिरावणी-शिवणगाव पूल खचला

By admin | Updated: June 12, 2017 00:56 IST

उद्घाटनापूर्वीच दुर्घटना : मुसळधार पावसाने दुर्दशा, दर्जाबाबत शंका; वाहतुकीस पूल बंद

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : महिरावणी ते शिवणगाव रस्त्यावर वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्घाटनापूर्वीच हा पूल खचला असून, पुलाच्या दर्जाबाबत चर्चा होऊ लागली आहे. महिरावणी-शिवणगाव पूल बांधकाम विभागाने पूर्ण केला असून, रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील शिवणगाव जवळ असलेला रस्ता खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या पुलावरून वाहने जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी दगड टाकून मार्ग बंद केला आहे. वर्षभरापूर्वी बांधकाम झाल्यानंतर पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने सदरच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी केली आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होणार असल्याने तत्पूर्वी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अनेक कामगारांना नोकरीसाठी शहरात यावे लागते. शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटमध्ये न्यावा लागतो. शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याच रस्त्यासाठी झाले होते आंदोलनमहिरावणी ते गणेशगाव रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी मनसेचे तालुका अध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १० डिसेंबर २०१५ रोजी गणेशगाव येथील जलकुंभावर चढून अभिनव आंदोलन छेडले होते. त्यानंतर जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. सुमारे ७ कोटी रु पये खर्चाच्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. या मार्गावरील पूलही तयार करण्यात आला. मात्र, अवघ्या वर्षभरानंतर आणि या पुलाच्या उद्घाटनापूर्वीच हा पूल खचला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.