शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्रा कंपनी सुरू होणार पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:26 IST

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.

सातपूर : महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास १६५० उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. तर जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणा-या महिंद्र अँड महिंद्र कंपनीलादेखील कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापनाने साशंकता व्यक्त केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २० एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगांना (जाहीर केलेला कॅन्टोन्मेंट एरिया वगळता) अटी-शर्ती अबाधित ठेवून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तीन हजारांवर उद्योगांनी आॅनलाइन परवानगी मागितली होती. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाºया १,६२७ उद्योगांना रीतसर परवानगी दिल्याने हे उद्योग सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणून महिंद्र अँड महिंद्र कंपनी आणि बॉश कंपनीकडे पाहिले जाते. या दोन्ही कारखान्यांच्या वेंडरची (सप्लायर्स) संख्या जवळपास एक हजाराच्या आसपास आहे. या दोन्ही कारखान्यांत आणि संलग्न लघुउद्योगात सुमारे २५ हजार कामगार काम करतात.जिल्हा प्रशासनाने जरी निर्बंध शिथिल केले असले तरी या मोठ्या उद्योग प्रकल्पांना उद्योग सुरू करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारे उत्पादन (पुरवठा) मिळणार नसेल तर मोठे उद्योग सुरू करून उपयोग होणार नाही. त्याशिवाय या मोठ्या उद्योगातील कामगारांना ने-आण करणे अडचणीचे ठरणार आहे. यांसह अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने या उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तरीही महिंद्र अँड महिंद्र कंपनीने बुधवारपासून (दि.२९) कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सुरू होणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. एवढेच काय उत्पादन प्रक्रि या नेमकी कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.--------जवळपास सव्वा महिन्यापासून कंपनीतील यंत्रे पूर्णपणे बंद आहेत. उत्पादन सुरू करण्यापूर्वी यंत्रांचे मेंटेनन्स आवश्यक आहे. त्यानंतर उत्पादन प्रक्रि या सुरळीत करण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्याचबरोबर वेंडर्स (सप्लायर्स) कडून लागणारा पुरवठा मिळणे गरजेचे आहे. काही मोजक्या कर्मचाºयांना बोलावून यंत्रे स्टार्टअपची कामे करणार आहे. बुधवारपासून नियोजन केले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रत्यक्षात उत्पादन कधी सुरू करता येईल त्याचे नियोजन करण्यात येत आहे. - प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष, महिंद्र अँड महिंद्र कंपनी, सातपूर

टॅग्स :Nashikनाशिक