मनोज देवरे ।कळवण : जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे.कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी प्रमोद कोळी या दोनवर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मत:च व्यंग होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती.योगायोगाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत आयोजित संदर्भसेवा शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक बहिरम यांनी माहेश्वरीची तपासणी केली. त्यावेळीच तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.पुढील उपचारासाठी तिला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अस्थिरोगतज्ञ डॉ. नीलेश शेलार, मरियम काझी यांनी बालिकेच्या व्यंग असलेल्या दोन्ही पायांवर यशस्वीरीत्या उपचार करून तिचे पाय सरळ केले. या उपचाराला प्रतिसाद मिळाल्यामुळे व माहेश्वरीचे पाय सरळ झाल्याने तिच्या पालकांनीही आनंद व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले.या डॉक्टर, परिचारिकांचे लाभले सहकार्यमाहेश्वरीला शस्रक्रिया व उपचार मिळणेकामी राष्ट्रीय बाल-स्वास्थ्य कार्यक्र म पथकातील डॉ. एच.डी. पाटील, डॉ.एम.एस. सूर्यवंशी, औषध-निर्माण अधिकारी वैभव काकुळते, मनोज जाधव, परिचारिका आहेर यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्र माचे जिल्हा समन्वयक संदीप पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:01 IST
जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे.
माहेश्वरीच्या पायांना मिळाले बळ
ठळक मुद्देकळवण । बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार