शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महेश झगडे यांची चौथ्यांदा बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:57 IST

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर. आर. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर. आर. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षातील झगडे यांची ही चौथी बदली आहे.  अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असताना झगडे यांनी भ्रष्ट अधिकारी आणि औषधविक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली होती. त्यामुळे तिथून त्यांची बदली करून त्यांना परिवहन खात्यात आयुक्त म्हणून पाठविण्यात आले.  मात्र, अवैध वाहतुकीविरोधात त्यांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे त्यांची परिहनमधून पुणे येथे ‘पीएमआरडी’ला बदली करण्यात आली. तिथे ते अवघे सव्वा वर्ष होते. तिथून त्यांना नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून पाठविण्यात आले. नाशिकला ते नऊ महिनेच होते. ३१ मे रोजी झगडे सेवानिवृत्त होत आहेत.माने आज पदभार स्वीकारणारनूतन आयुक्त राजाराम माने  गुरुवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी बीडला मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांची पुण्यात महाराष्टÑ ऊर्जा अभिकरण महासंचालक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली.

टॅग्स :commissionerआयुक्त