शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

येवला वनविभागाने घडविली मायलेकरांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:16 IST

आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवनप्रवास आहे. आईचे वात्सल्य तिच्या लेकरांचे जीवन असे व्यापून टाकते की, त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते.

निफाड : आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवनप्रवास आहे. आईचे वात्सल्य तिच्या लेकरांचे जीवन असे व्यापून टाकते की, त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. ताटातूट झालेल्या लेकरांचा शोध घेऊन आई जेव्हा कवेत घेते, तेव्हा झालेली ही भेट भावभावनांचा कल्लोळ असतो. बिबट्याची मादी आणि तिच्या चार बछड्यांची झालेली भेट हा त्याचाच एक साक्षात्कार आहे. अशीच मायलेकरांची भेट घडवून आणण्याचा निफाड तालुक्यातील तिसरा प्रयोग यशस्वी झाला आहे.  येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील नागापूर येथे शरद नाठे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कामगारांना २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. नाठे यांनी येवला वनविभागाला कळविल्यानंतर पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बछडे ताब्यात घेतले. यातील दोन बछडे नर, तर दोन बछडे मादी आहेत. हे बछडे १५ दिवसांचे होते. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक डॉ. सिवाबाला यांच्या मार्गदर्शनाखाली येवल्याचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. एम. राठोड, वनरक्षक विजय टेकनर. वनरक्षक भरत पाटील, भय्या शेख आदींच्या पथकाने नाठे यांच्या शेतात जुन्नर पॅटर्न वापरून बछडे आईच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला.  ज्या दिवशी बछडे सापडले, त्याच रात्री हे बछडे एका प्लॅस्टिकच्या के्रटमध्ये ठेवून त्यावर दुसरा के्रट ठेवण्यात आला. शेजारी शेतात मादीला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याची मादी बछडे ठेवलेल्या क्रेटजवळ आली. तीन बछड्यांना तोंडात धरून एकेक करून ती घेऊन गेली; मात्र चौथे बछडे तिथेच राहिले. त्यामुळे वनविभागाने पुन्हा रविवारी (दि. २५) हा प्रयोग राबवला. सोमवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास हे चौथे बछडेही मादी घेऊन गेली.मादी हिंसक होऊ नये म्हणून...मादी आणि तिच्या बछड्यांच्या भेटीचा प्रयोग जुन्नर तालुक्यात वनविभाग करीत आहे. सापडलेले बछडे के्रटमध्ये ठेवून ते बिबट्या मादीच्या स्वाधीन केले जात आहे जेणेकरून बछड्याच्या ताटातुटीने बिबट्या मादी हिंसक होऊन नागरिकांवर हल्ले करणार नाही हा उद्देश आहे. जुन्नर फॉर्म्युला निफाड तालुक्यात तिसऱ्यांदा यशस्वी झाला. यावर्षी येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे, शिवरे येथे अशाच पद्धतीने बछडे आईच्या ताब्यात दिले. नागापूर येथे यशस्वी झालेल्या हा तिसरा प्रयोग आहे. येवला वनविभागाने मायलेकरांची भेट घडवून आणल्याने या प्रयोगाचे निफाडकरांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या