शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच खड्यांना जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:27 IST

नाशिक- शहरातील खड्डे बुजवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या पाच वर्षे कार्यकाळातील रस्ते अत्यंत सुस्थितीत आहेत. मात्र, भाजपाच्या पाच ते बारा वर्षे दरम्यानच्या कालावधीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या काळात कोणाची सत्ता होती, त्याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला भाजपाने दिला आहे.

ठळक मुद्देभाजपचा पलटवार: आत्मपरिक्षणाचा विरोधकांना सल्ला

नाशिक- शहरातील खड्डे बुजवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजपाच्या पाच वर्षे कार्यकाळातील रस्ते अत्यंत सुस्थितीत आहेत. मात्र, भाजपाच्या पाच ते बारा वर्षे दरम्यानच्या कालावधीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या काळात कोणाची सत्ता होती, त्याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला भाजपाने दिला आहे.भाजपाच्या सत्तेच्या काळात विकास कामे वेगाने होत असल्याने विरोधी पक्षांकडून अकारण टीका केली जात असल्याचे पदाधिका-यांनी म्हंटले आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सत्तारूढ भाजपावर शरसंधान केले होते. खड्डड्यांना सत्तारूढ भाजपा जबाबदार असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला होता. ठेकेदारांची साखळी असून त्यांच्यासाठीच खडड्डे ही समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप रंजन ठाकरे यांनी केला होता.त्यावर उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेता सतीश सोनवणे आणि गटनेता जगदीश पाटील यांनी उत्तर दिले आहे. खड्डे पडलेले रस्ते हे शिवसेना- राष्ट्रवादीच्या काळातील असल्याचा आरोप केला आहे. रस्ते दुरूस्तीच्या नावाखाली तीस कोटी रूपयांचे कंत्राट देण्याचा घाटत असल्याचा आरोप सुरू असला तरी त्याबाबत स्पष्टीकरण देताना २०१९-२० या वर्षाच्या अंदाजपत्रकात १४ कोटी रूपये रस्ते दुरूस्तीसाठी तर १३ कोटी २५ लाख रूपये हे खडी, मुरूम, सारखे मटेरीयल खरेदीसाठी आहे. तसेच जेसीबी,पोकलन भाड्यानेघेण्यासाठी देखील तरतूद आहे. सर्वसाधारणपणे १३०० किमी डांबरी आणि खडीच्या रस्त्यांची दुरूस्ती त्यात अपेक्षीत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून केबल टाकण्यासाठी रस्ते खोदल्याने त्या बदल्यात ३५ कोटी रूपये महापालिकेकडे जमा आहेत. गेल्या तीन वर्षात तयार करण्यात आलेले ६० कोटी रूपयांचे रस्ते सध्या ठेकेदाराकडे देखभाल दुरूस्तीच्या दायीत्व कालावधीत आहेत. त्यामुळे सध्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडले ते भाजपाच्या सत्ताकाळातील नसून पाच ते १२ वर्षांपूर्वीच्या कालावधीतील अहोत. त्यावेळी महापालिकेत सत्ता कोणाची होती याचे आत्मपरिक्षण करा असा सल्ला देखील भाजपाच्या या पदाधिका-यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण