नाशिक : शहरात ठिकठिकाणी वीरशैव समाजाचे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. पंचवटीतील गोपाळनगर येथील शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. संघटनेचे जिल्हाप्रमुख बबन गवळी, उमाकांत गवळी, शिवा कर्मचारी महासंघाचे अरुण लद्दे, युवक गवळी समाजाचे अध्यक्ष अनिल नाईक, डॉ. प्रकाश कबाडे, प्रभाकर कस्तुरे, गणेश कोठुळे, सोनू चौघुले, सुनील कारेगावकर, आशिष हिंगमिरे आदि उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पेठरोडवरील दत्तनगर येथे शिवा संघटना, वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने काशीनाथ कोठुळे व सदाशिव कोठुळे यांच्या हस्ते महाराज बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बबन गवळी, अनिल नाईक, अरुण लद्दे, सोनू चौघुले, अमर कोठुळे, रुपेश कोठुळे, सुनील चौघुले, सागर चौघुले, मनोज कोठुळे, रतन कोठुळे, चेतन कोठुळे, स्वप्नील आरवणे आदिंसह समाजबांधव उपस्थित होते. नाशिकरोड येथील सिद्धेशवर पतसंस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. रवींद्र दंदणे, मंगेश खोडदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संजय फोलाणे, डॉ. संदेश हिंगमिरे, अनिल गुळवे, बी. बी. दंदणे, धोंडू हिंगमिरे, जगन्नाथ तांदळे आदि उपस्थित होते. वीरशैव नागरी पतसंस्थेच्या वतीने रमाकांत होनराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नाना नगरकर, बद्रिनाथ वाळेकर, वसंतराव नगरकर, भीमाप्पा नीळकंठ, पांडुरंग गाडे, नंदकिशोर नगरकर, प्रकाश तकने, सचिन घोडके आदिंसह कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. राजीव गांधी भवन येथे महापौर यतिन वाघ यांच्या हस्ते महाराज बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वीरशैव समाजाचे अनिल चौघुले, धोंडू हिंगमिरे, राजेंद्र भोरे, जगन्नाथ तांदळे, डॉ. संदेश हिंगमिरे, गणेश लोहारकर, सुशीलाबाई आंघोळकर, लतिका साखरे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राजन महमाने, अनिल कोठुळे, अरुण आवटे यांच्यासह वीरशैव समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कार्यालयातही महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी माळोदे, बबन गवळी, अरुण लद्दे उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी बी. जी. गरड यांनी केले. कैलास मंडलिक यांनी आभार मानले. सातपूर कॉलनीतील गुंजाळ पार्क हौसिंग सोसायटी येथे राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी दत्ता गझवार, आबा सुराडे, तिमैया स्वामी, महेश घोंगाणे, धोंडू हिंगमिरे, दीपक हिंगमिरे, बाळासाहेब जाधव आदि उपस्थित होते. देवळालीगाव येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात भिकन फत्तरफोडे, रामनाथ नगरकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नाना नगरकर, बद्रिनाथ वाळेकर, संजय फोलाणे, नंदकिशोर नगरकर, महेश डबे आदि उपस्थित होते. देवळालीगावातील गांधी पुतळा येथे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार गणूभाऊ बोंद्रे, डॉ. राज नगरकर, बंटी कोरडे, योगेश घोलप यांच्यासह वीरशैव समाजबांधव उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात
By admin | Updated: May 5, 2014 19:33 IST